जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवारातील रहिवाशांना सोबत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढून त्वरित पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याच इशारा देण्यात आला.
कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवार येथील नागरिकांच्या विविध समस्याबाबत मुख्य कार्यकारी यांच्याकडे निवेदन देऊन सुध्दा पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यात न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या परिसरातील पाण्याची समस्या त्वरीत सोडवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी केली. कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवार येथील नागरिक विविध समस्यांपासून मागील ५ वर्षापासून विविध समस्या जसे की पिण्याचे पाणी, रोड रस्ते, गटारी आदी नसल्याने त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाण्याची काहीएक सुविधा नाही, त्यांच्या परिसरात ज्या बोअरवेल वरुन पाणी मिळत होते त्या सुध्दा आता उन्हाळा सुरु झाल्याने त्यांची पातळी खोलवर गेली असून त्या बंद झालेल्या आहेत. म.न.पा. कडून सुध्दा काहीएक सुविधा मिळत नाही व आपणांकडून सुध्दा नाही, मग त्यांनी जायचे कुणीकडे? तसेच संबंधित रहिवाशी नेहमी न चुकता घरपट्टी, करपट्टी इत्यादी शासनाच्या वेळेवर भरणा करीत आलेले आहेत. परंतु त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित सावखेडा शिवार परिसर हे ग्रामपंचायत हद्दीत येत असून तेथील सद्यस्थितीतील सरपंच व ग्रामसेवक हे त्याठिकाणी जे नविन बिल्डर घरे व प्लॉट बांधतात त्यांना तात्काळ नळ कनेक्शन देतात व त्या ठिकाणचे मागील ८ ते १० वर्षापासून जवळपास ३६ घरे ही रहिवास करीत आहेत. परंतु त्यांना संबंधितांकडून पाण्याचे नळ कनेक्शन आजपावेतो दिलेले नाही. व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जे सरंपच, ग्रामसेवक व सदस्य यांचे ओळखीचे लोक आहेत त्यांना ते नळ कनेक्शन देत आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, विनोद शिंदे, आशीष सपकाको, मुकुंदा रोट, राजेंद्र नीकम, कुणाल पवार, संदीप महाले, ‘योगेश पाटील, पंकज चौधरी,कुणाल पाटील, महेश माळी, जसवंत राजपुत, किरण तळेले, योगेश पाटील, रजाक सय्यद, स्वप्नील नेरकर आदींसह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5201853966526664
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/264930915787952