उचंदे जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

बोदवड – लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उचंदे येथील जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा युवा फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

संत गाडगेबाबा युवा फाऊंडेशनचे निर्मल भालेराव यांचे संत गाडगेबाबा यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी राजू तडवी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संजय ठोसर, शालेय समितीचे अध्यक्ष नगीन वाघ, शेख तस्लीम शेख सलीम, निलेश मेढे होते.

यावेळी पहिली ते दहावीच्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षण विस्ताराधिकारी राजू तडवी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, संत गाडगे युवा फाऊंडेशनचा खूपचं कौतूकास्पद कार्यक्रम आहे. गरीबी मुळे शिक्षण घेता येत नाही.हा समज मनातून काढून टाका, क्रांती जन्माला घालायची असेल तर कष्ट घेण्याची जिद्द ठेवा. नंतर संजय ठोसर यांनी ही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक यांनी प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाला श्रीमती गाढे, सुरेश पाटील , श्रीमती गजभिये, सुरेश पाटील, अरूण सवर्ने, श्रीमती गायकवाड उपस्थित होते. आभार शाळेचे मुख्याध्यापक साहित्यिक डॉ.अ. फ .भालेराव यांनी मानले.

Protected Content