यावल कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे व्याख्यान

यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे चौथे पुष्प अरुण सोनवणे यांनी गुंफले. अध्यक्षस्थान उपप्राचार्य अर्जुन पाटील यांनी भूषविले. सदर कार्यक्रम प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

 

अरुण सोनवणे यांनी पैश्यांची उत्क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,   एकमेकांची गरज भागवणारी वस्तू म्हणजे पैसा. प्राचीन काळ ते वर्तमान काळापर्यंत याचे स्वरूप बदलत गेले. पशु पैसा, वस्तू पैसा, धातु पैसा, कागदी पैसा, पत पैसा व इत्यादी पैसा असा बदल होत गेला.  अध्यक्षीय स्थानावरून प्रा. अर्जुन पाटील पाटील यांनी सांगितले की, पैश्यांमधील बदल माणसाने आपली आर्थिक व्यवस्था सुरळीतकरण्यासाठी केला.   सूत्रसंचलन प्रबोधिनीचे समन्वयक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले तर आभार प्रा. एस. आर. गायकवाड यांनी मांनले. कार्यक्रमास उपप्राचार्य संजय पाटील, डॉ. एस. पी. कापडे व इतर सर्व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content