फैजपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बुथ समितीची बैठक

फैजपुर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आज रावेर-यावल मतदारसंघाची बुथ समितीची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

आज पार पडलेल्या बुथ समितीच्या बैठकीला आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष मुकेश येवले, न. पा. गटनेते शेख कुर्बान, शहराध्यक्ष अनवर खाटीक, जेष्ठ नेते गिरधर पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल साठे, रावेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, रावेर बाजार समिती सदस्य मंदार पाटील, रावेर शहराध्यक्ष महेमुद मन्यार, रावेरचे नितिन पाटील, दत्तु पाटील, उंटावद विका सोसायटी चेअरमन शशी पाटील, अय्युब सर, माजी उपनगराध्यक्ष रशिद तडवी, एम. बी. तडवी, यावल शहराध्यक्ष करीम मेंबर, महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा निळ, गुणवंत निळ, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव, महिला विधानसभा अध्यक्षा ममता आमोदकर, निलेश आमोदकर, तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फारुख शेख, मोहसिन शेख शाकीर शेख, साजिद भाई, विनोद पाटील, भालोद चे राहुल चौधरी, बापु जासुद, यावल सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष कामराज घारु, अरुण लोखंडे तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content