आदिवासी संघटना पीआरसीकडे डोंगर कोठारा येथील भ्रष्टाचाराची चौकशीची करणार मागणी

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या मागील सहा वर्षातील विविध योजनाची विकासकामे ही अत्यंत निकृष्ट प्रतीची झाली आहेत. या संदर्भात आज आदिवासी  तडवी भिल एकता मंचच्या वतीने पंचायतराज समितीला तक्रार देण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

या संदर्भात आदिवासी तडवी भिल एकता मंचचे रबील तडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत सन् ०१५ते २०२१च्या या कालावधीत शासनाच्या १४ व्या आणि १५ व्या  वित्त आयोगच्या माध्यमातुन लाखो रुपयांचा निधी मागासवर्गीय दलीत वस्तीसह इतर अनेक योजनाच्या कामांसाठी प्राप्त झाला आहे.  ही कामे संपुर्णपणे हम करे सो कायदा प्रमाणे झालेले या नियमानुसार झाली आहेत. सर्व झालेली बांधकाम ही शासनाच्या अंदाज पत्रकामधील अनुसार व दिलेल्या item of work झालेले आहेत का याची सखोल चौकशी  करण्यात यावी. त जिल्हा परिषदचे विभागीय बांधकाम अभियंता रावेर यांनी दिलेल्या कामाची मोजमाप MB पुस्तीकामध्ये या कामांची नोंद करण्यात आली आहे का ?, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळावा याद्दष्टीकोणातून  होणाऱ्या कामांची पेपर ई निविदा या कुठ ही नियमा अनुसार देण्यात येणारी जाहीरात दिसुन आलेली नाही.  सुशिक्षित बेरोजगारांना माहीती देवुन रोजगार मिळावा असे या हेतुने गावातीत सार्वजनिक ठिकाणी  किंवा ग्रामपंचायतच्या आवारात सुुचना किंवा माहीती फलकावर नोंद करून माहीती दिल्याचे ही ग्रामपंचायत स्तरावर आज पर्यंत दिसुन आलेले नाही. डोंगर कठोरा गावातील दलित मागासवर्गीय वस्ती सुधार योजने अंतर्गत व इतर ठीकाणी विकासकामांसाठी झालेला खर्च हा कागदावरच दिसुन येत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. गावातील अंगणवाडी दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा, ग्राम पंचायत कार्यालय दुरूस्ती पेवर बलॉक रस्ता करणे, सिमेंट काँक्रीट रस्ता करणे , भुमीगत गटारी बांधकाम करणे , अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश पुरविणे , फर्निचर खरेदी करणे , टीसीएल पावडर खरेदी करणे , संगणक खरेदी करणे , अपंग लाभार्थ्यासाठी आवश्यक वस्तु पुरविणे, पाणीपुरवठा आणी आरोग्यावर खर्च करणे , विद्यार्थ्यांसाठी RO खरेदी करणे अशा प्रकारे ग्रामपंचायतच्या माध्यमातुन शासनाच्या E – Gramswaraj वेबसाईटवर मोठया प्रमाणावर खर्च दाखण्यात आल्याचे दिसुन येत असुन , सदरील दर्शविण्यात आलेली सर्व कामे सन् २०१५ते २०२१पर्यंतच्या कालावधीत विविध योजनांच्या निधीतुन योग्य प्रकारे झालेले आहे का याची  वरिष्ठ पातळीवर तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी अशी व या सर्व भ्रष्ठाचारात व गैरकारभार करणाऱ्या ग्रामसेवक , बांधकाम अभीयंता, ठेकेदार मंडळीवर कायद्याशीर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आदीवासी तडवी भील एकता मंचचे जळगाव जिल्हा रबील तडवी यांनी केली असुन , या संदर्भात संघटनेच्या वतीने पंचायतराज समितीला कार्यवाहीसाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे ही म्हटले आहे .

Protected Content