पदोन्नती मधील आरक्षणाच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । राज्य सरकारने दि. १८ फेब्रुवारी रोजी पदोन्नती मधील आरक्षण लागू केल्याने राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आज याविरोधात काळी फित बांधून आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने दि. १८ फेब्रुवारी रोजी पदोन्नती मधील आरक्षण राज्यभर लागू केले. या निर्णयाविरोधात निषेध करत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आज तहसील अमोल मोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. जो नियम लागू करण्यात आले आहे. त्याचा निषेध करत काळी फित बांधून यावेळी आंदोलन करण्यात आले.  हा नियम १८ रोजी महाराष्ट्राभर लागू करण्यात आले. त्यामुळे याचे निषेधार्थ आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच लवकरात लवकर निर्णय घेऊन हि समस्या मार्गी लागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेने दिला आहे. आंदोलन व निवेदनाप्रसंगी निवृत्त प्राध्यापक निकम , केदारे, लवंगे , प्रा. ठाकरे, अफसर खाटीक,  डी. पी. पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content