‘रहा अपडेट’ व्हाट्सअप गृपतर्फे पातोंडा येथे वृक्षारोपण (व्हिडीओ)

faddd386 1d20 4a6d 9d61 deb91698b634

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील ‘रहा अपडेट’ व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून आज (दि.११जुलै) तालुक्यातील पातोंडा येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षिका यांच्या हातून सुमारे ४० वृक्षांची लागवड करून या वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी येथील विद्यार्थ्यांवर ‘एक झाड दोन विद्यार्थी’ या स्वरूपात वाटून देण्यात आली आहे.

 

या गृपतर्फे गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागांमध्ये तसेच तालुक्यातील गावांमध्ये वृक्षारोपणाची व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी कोणी वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली असेल, त्यांना या ग्रुपच्या माध्यमातून वर्धमान धाडीवाल यांच्या दातृत्वातून व प्रादेशिक वनीकरण आणि सामाजिक वनीकरण या वनविभागाच्या माध्यमातून झाडांची रोपे उपलब्ध करून देऊन ते जगवण्याची हमी घेतली जात आहे.

आज वृक्षारोपण करत असताना विशेष करून विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. वृक्ष जगवण्याची उत्सुकता या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली या वृक्षारोपणप्रसंगी ग्रुपचे सदस्य दिलीप घोरपडे, वर्धमान धाडीवाल, शरद पाटील, प्रताप देशमुख, खुशाल पाटील, यांच्यासह या विद्यालयाचे शिक्षक एम.बी. विसपुते, टी. बी. निकम, पी.व्ही. पाटील, सौ.जे.एस. देशमुख आदी उपस्थित होते.

 

Protected Content