पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णलयाचा दर्जा  

download 4

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हारूग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. रुग्णालयाची ३० खाटावरून ५० खाटापर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

 

पाचोरा येथे सध्या ग्रामीण रूग्णालय कार्यरत आहे. मात्र तालुक्यातील रूग्णाची संख्या व त्यासाठी अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० खाटांच्या पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आहे. आरोग्य सुविधा मिळणार पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने तालुक्यात आता जिल्हा रूग्णालयाच्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय खांटाची संख्या ही वाढणार आहे. सद्य:स्थितीला पाचोरा ग्रामिण रुग्णालयाची ३० खाटांची क्षमता आहे. आता ती क्षमता ५० एवढी होणार आहे. त्यामुळे खांटाअभावी रूग्णांना गैरसोय होणार नाही. खाटांची क्षमता वाढल्याने पर्यायाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. शासानाच्या या निर्णयाने पाचोराकरांनी समाधान व्यक्त केले आहे. पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याने आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरींकानी या कामाचे कौतुक केले आहे.आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.आमदार किशोर पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज शी बोलतांना सांगितले की, पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मोठे समाधान आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच भडगाव येथे उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा व इमारत बांधकामाचा प्रश्न मागील आठवड्यात मार्गी लागला आहे.

Protected Content