सांगवी येथे एकाच दिवशी विक्रमी लसीकरण

चाळीसगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील सांगवी गावाला पाचशे कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध झाल्याने शनिवार रोजी एकूण ४७० जणांचे लसीकरण करण्यात आले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार मंगेश चव्हाण यांनी मिशन कोरोनामुक्ताचे संकल्प केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील सांगवी गावाला शनिवार रोजी ५०० कोव्हिशिल्डचा डोस उपलब्ध झाले. त्याअनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या डोस घेणारे  असे एकूण ४७० जणांचे लसीकरण करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रजिस्टर करण्यापासून तर त्यांना लस टोचून घेण्यापर्यंत स्थानिक तरूणांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव येथील आरोग्य सेवक नितीन तिरमाळी, आरोग्य सहाय्यक आर.जे. जोहरी , परिचारिका कविता राठोड व सुनंदा चव्हाण (पवार), व ग्रामपंचायत सदस्य, शिपाई व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच महेंद्रसिंग राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले आहेत.

Protected Content