शंकराचार्य जगतगुरू स्वामी स्वरूपानंद यांचे देहावसान

नरसिंगपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य जगतगुरू स्वामी स्वरूपानंद यांनी आज शेवटचा श्‍वास घेतल्याने करोडो भाविकांवर शोककळा पसरली आहे.

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात झाला होता. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी येथे घेतले होते.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी १९५० मध्ये ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड सन्यासाची दीक्षा घेतली होती. १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली होती. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्वातंत्र्यलढ्यात देखील भाग घेतला होता. त्यांने १५ महिने तुरुंगवास भोगला. तसेच, राम मंदिर लढ्यात देखील शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा होता.

Protected Content