पुढील दोन-तीन दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा ?


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

 

२०१४ मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी लागले होते. २३ ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. २०१४ मध्ये नक्षलग्रस्त झारखंडच्या निवडणुका २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या दरम्यान ५ टप्प्यांत झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे.

Protected Content