विहीरीचा मोबदला देण्यात आर्थिक घोटाळा: डाॅ. अश्विन सोनवणे

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

जळगाव प्रतिनिधी । महापालिका प्रशासन व जागामालक यांच्यात भुसंपादन विहरीचा मोबदला देण्यावरून उच्च न्यायालयात ८ जुलैला झालेल्या कामकाजेत दोन आठवड्याची मुदत दिली होती. तरी देखिल न्यायालयात १२ कोटी पैकी ६ कोटी ९२ लाखाच धनादेश महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात दिला. यात आर्थिक घोटाळा असून याबाबत मुख्यमंत्री व पालकंमत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माहिती उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी दिली..

विहीर भुसंपादन प्रकरणी महापालिकेने देलेल्या मोबदल्या प्रकरणावर आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक धिरज सोनवणे, ऍड. दिलीप पोकळे, चेतन सनकत उपस्थित होते.
पुढे बोलतांना उपमहापौर डॉ. सोनवणे म्हणाले, की रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी तसेच विविध समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन निधी नसल्याचे सांगून हात वरती करते. परंतू या विहिरीच्या मोबदला देण्याबाबत महासभेत ठराव करून सुध्दा पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात न घेता तसेच उच्च न्यायालयाने दोन आठवड्याची मुदत दिली असता दोन दिवसात घाईघाईने ६ कोटी ९२ लाखचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात का जमा केला. या मागे आर्थिक घोटाळा असून यात महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच भुसंपादन रॅकेट आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कडे तक्रार करणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका व जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या धानादेश स्टे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.

Protected Content