जिल्ह्यात आज नवीन ३०५ कोरोना पॉझिटीव्ह; बाधीतांचा आकडे सात हजारांच्या पार !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३०५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा सात हजारांच्या पार पोहचला आहे. तर आजच १८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ३०५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या सोबत भुसावळ-२८; पारोळा-२२; जामनेर-२१; चाळीसगाव-१६; चोपडा व पाचोरा-प्रत्येकी १३; जळगाव ग्रामीण-११; रावेर-१०; मुक्ताईनगर-९; बोदवड व धरणगाव-प्रत्येकी ७; एरंडोल व अमळनेर-प्रत्येकी ४; यावल-३; भडगाव-२ आणि अन्य जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ७२७५ इतकी झाली आहे. यातील ४४१८ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच १८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ३७१ रूग्णांचा मृत्यू झाला असून २४८६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

Protected Content