दत्त ठिबकच्या युनिटला मोझांबिकच्या व्यावसायिकाची भेट

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । जगभरात आपल्या अमीट गुणवत्तेची छाप उमटवणार्‍या येथील दत्त ड्रीप कंपनीच्या Datta Drip Irrigation युनिटला मोझांबिक येथील व्यावसायिकाने नुकतीच भेट देऊन माहिती जाणून घेतली.

फैजपूरच्या औद्योगीक वसाहतीमध्ये असणार्‍या दत्त इरिगेशन कंपनीने देश-विदेशात नावलौकीक प्राप्त केला आहे. कंपनीची विविध उत्पादने हे देशाच्या विविध भागांसह विदेशातही वापरले जात आहेत. Datta Drip Irrigation या कंपनीचे संस्थापक जितेंद्र पवार यांचे अलीकडेच अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र युगंधर पवार यांनी कंपनीची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा ते समर्थपणे चालवत आहेत.

दरम्यान, अनेक आफ्रिकन देशांमध्ये दत्त इरिगेशनचे प्रॉडक्ट निर्यात होत असल्याने तेथे कंपनीबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे. या अनुषंगाने मोझांबिक येथे स्थायीक झालेले व्यावसायिक तनय पाटील यांनी फैजपूर येथील युनिटला भेट देऊन विविध प्रॉडक्ट, त्याचे प्रात्यक्षीक, यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आदींची पाहणी केली. त्यांनी युगंधर पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांशी चर्चा केली.

दत्त ड्रीप बाबत –

दत्त ठिंबक Datta Drip Irrigation फैजपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा यासाठी अतिशय कमी खर्चात पण उत्पादनात मोठी वाढ, यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. कै, जितेंद्र पवार सर, यांनी शैक्षणिक पदवी प्राप्त करून सेवा दिली,पण त्यांना नेहमीच शेतकरी बांधवां प्रती मोठी आपुलकी होती, कारण तेही एक भूमीपुत्र होते. म्हणून रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे, तसेच जितकें पाणी भरतीने शेतकरी देतोय, त्यासाठी त्याला खूप वेळ लागतो, वीज तेवढीच लागते, पण कष्ट खुप सहन करावे लागत आहे, यांचं जाणिवेतून कै जितेंद्र पवार सर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान चा मागोवा घेतला,

आणि आपण शेतकरी व पाणी बचतीसाठी, शंभर टक्के काही करू शकतो, असा चंग स्वतः शी बांधला, आणि अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत दत्त ठिंबक ची फैजपूर येथे कंपनी स्थापन केली. आजपर्यंत अतिशय शेतकऱ्यांच्या हितासाठी दत्त ठिंबक फैजपूर निर्विवाद कार्य करीत आहेत, दत्त ठिंबक फैजपूर विषयी परिसरातील शेतकरी विश्वास ठेवून उत्पादन वापर करीत आहेत.

कै जितेंद्र पवार सर यांच्या अकाली निधनाने मुळेच त्याचे सुपुत्र युगंधर जितेंद्र पवार हे सुद्धा वडिलांचा वारसा आणि कार्य अतिशय उत्तम रितीने चालवित आहेत, आणि शेतकरी त्यांचाही केंद्र बिंदू असे.

Protected Content