चैतन्य तांडा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडाला कोव्हिशिल्डच्या ६० डोस प्राप्त झाल्याने येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी एकूण ६० जणांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण मानवजातीला हतबल करून ठेवले आहेत. कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली असली तरी तीसरी लाट हि केव्हाही येऊ शकते. या गोष्टीची दक्षता घेऊन सरकारने लसीकरण करण्यावर अधिक भर दिला आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला मंगळवार रोजी कोव्हिशिल्डचे ६० डोस उपलब्ध झाल्याने प्रत्यक्षात लसीकरणाला सकाळी ९ वा. सुरूवात करण्यात आली. यावेळी गावाच्या प्रथम नागरिक या नात्याने पहिली लस सरपंच अनिता राठोड यांनी टोचून घेतली. त्याचबरोबर इतर जणांनीही लसीकरण करून घेतली.

याप्रसंगी माजी चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण, प्रवीण चव्हाण, साईनाथ राठोड, घनश्याम राठोड, संदीप पाटील, अनिता कुमावत, सुखदेव राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, विकास राठोड, संतोष पवार, आशा सेविका कविता राठोड, अंगणवाडी मदतनीस उषा राठोड, पुष्‍पाबाई राठोड, कल्पना पवार, शिक्षक मनोहर आंधळे, करगावाचे माजी उपसरपंच नरेंद्र राठोड, गजानन चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते. लस सुरक्षित असल्याने सर्वांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन दिनकर राठोड यांनी केले आहेत.

Protected Content