जळगावात गर्भवती स्त्रियांच्या विविध आजारावर कार्यशाळा संपन्न (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  इंडियन क्रिटिकल केअर सोसायटी व आयएमए जळगावतर्फे गर्भवती स्त्रियांच्या विविध गंभीर आजारावर आयोजित कार्यशाळेचे डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

आयएमए सभागृहात आयोजित कार्यशाळेत गर्भवती स्त्रियांच्या विविध गंभीर आजारात अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, जंतुसंसर्ग, मेंदू विकार अशा विविध आजारांवर औरंगाबाद पुणे जळगाव येथील विविध तज्ज्ञांनी चर्चा व मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विलास भोळे, डॉ. सी. जी. चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन डॉ राजेश डाबी, सेक्रेटरी डॉ. रवींद्र पाटील, खजिनदार डॉ. अमित हिवरकर,कार्यकारी सदस्य डॉ.पल्लवी राणे, डॉ कल्पेश गांधी, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. दीपक पाटील (चोपडा ), डॉ. राजेश मानवतकर (भुसावळ), डॉ. पंकज बढे सदस्य उपस्थित होते. मावळते चेअरमन डॉ. संजय उंबरकर, मावळते सेक्रेटरी डॉ. लीना पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा अभिनंदन केलं.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1646038709091176

 

Protected Content