कुरंगीतील तरुणाची फेसबूकने केली निवड – सव्वा कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज

पाचोरा, – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील रहिवाशी तरुणाने उच्च शिक्षण घेऊन ‘मेटा फेसबुक’मध्ये सव्वा कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज घेऊन निवड झाल्याने त्याच्या या निवडीने आमदार माजी आमदार सरपंच व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

कुरंगी तालुका पाचोरा येथील रहिवासी असलेले व हल्ली मुक्काम मुंबई येथील दूरदर्शनमध्ये काम करणारे रामराव संतोष पाटील यांचा लहान मुलगा आशिष पाटील याने इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई येथे ‘बी.ई. कॉम्प्यूटर’चे शिक्षण येथे घेऊन ‘मास्टर ऑफ सायन्स’चे शिक्षण ‘फ्लोरीडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मायामी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथे घेतले. नुकतेच ‘मेटा फेसबुक सिलिकॉन व्हॅली’, कॉलिफोर्निया, अमेरिका येथे १ कोटी २५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घेऊन निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

त्याच्या या निवडीबद्दल पाचोरा – भडगावचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, कुरंगी – बांबरूड गटाचे जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, वडील रामराव पाटील, चांदसर येथील मामा सुनील शिंदे, सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार व्ही .एन. पाटील, रंगराव पाटील, आबा साखरे, कुरंगी सरपंच मनिषा गणेश पाटील , योगेश ठाकरे, पत्रकार नगराज पाटील, भारत शंकपाळ यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Protected Content