पाण्याच्या डोहात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा कांताई बंधाऱ्याजवळील पाण्याच्या डोहात पडल्याने  बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वानखेडे सोसायटी साईबाबा मंदिराजवळ भागात राहणारा शुभम कांतीलाल चव्हाण (वय-२०) हा तरुण पाच मित्रांसोबत रविवार १३ मार्च रोजी दुपारी फोटो काढण्यासाठी कांताई बंधाऱ्याजवळील परिसरात गेला होता. पाच मित्रांसोबत येत असतांना दोन जणांचा पाय घसरून पाण्यात पडले. यापैकी एकाला या मित्रांनी वाचण्यात यश आले, परंतु पाण्यात पडलेल्या शुभम चव्हाण हा पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच शुभमच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला होता. शुभम चव्हाणचे वडील हे शहरातील नवीन बी.जे. मार्केटमध्ये चव्हाण इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकानात काम करतात. त्यांच्या पश्चात दोन बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परिवार आहे. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Protected Content