फैजपूर येथे विवाहित तरुणाची गळफास घेत आत्महत्या

फैजपूर- लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील एका ४० वर्षीय विवाहित तरुणाने पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने नैराश्येतून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस निलेश मोहन चौधरी ४० वर्षीय तरुणाने (रा. त्रिवेणी वाडा) घराजवळ असलेल्या आपल्या गुरांच्या गोठ्यामध्ये कामासाठी आला असता त्याने पत्री शेडच्या ॲगलला दोराने गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले. घटनेप्रकरणी अनिरुद्ध सरोदे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मोहन लोखंडे हेडकन्स्टेबल अनिल पाटील पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहे.

Protected Content