नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता यांची याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, आज सकाळी सुप्रीम कोर्टानेही क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे सर्व दोषींना उद्याच फाशी होईल, यावर शिक्कामोर्बत झाले आहे.
निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने आज सकाळी फेटाळली. फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात यावे अशी विनंती त्याने या याचिकेतून कोर्टाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने पवनची याचिका फेटाळली. तसेच उद्या फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर आता पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे उद्या चारही दोषींना फाशी दिली जाणार असल्यावर शिक्कामोर्बत झाले आहे. दरम्यान, जल्लाद पवनने देखील आज तिहार तुरुंगात दोषींच्या डमीला फाशी देऊन प्रात्यक्षिक केल्याचेही कळते. सर्व दोषींना उद्याच फाशी होईल असा मला विश्वास वाटत असल्याचे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.