ट्रकची बसला जोरदार धडक; १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवाशी जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते मोंढाळे दरम्यान एस.टी.बसला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसमधील १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे.

 

पाचोरा मोंढाळा रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्यासमोर मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोऱ्याच्या दिशेने येणारी बस क्रमांक (एमएच १० बीएल १६१८) आणि पाचोराकडून (सातंगाव डोंगरी ) मोंढाळाकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २०- ७५२१) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवाशी जखमी झाले आहे.  अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.

 

मुक्‍कामी असलेल्‍या बसने वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, सातगाव तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाचोरा येथे आवागमन करतात. १३ विद्यार्थी व ७ प्रवाशी असे २० प्रवासी या बसमध्ये होते. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंधळ निर्माण झाला.

Protected Content