रेकॉर्डवरील गुन्हेगार २ वर्षांसाठी हद्दपार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय- ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. याबाबतचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत.

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील भूषण रघुनाथ सपकाळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यासह तालुका पोलीस ठाण्यात ९ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून त्याच्यामुळे जिवितास व जंगम मालमत्तेला धोका आहे. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परंतु त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याच्यामुळे जनतेच्या जिविताला व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने भूषण सपकाळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पोकॉ प्रवीण पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता.

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी काढले आदेश

प्रस्ताव सादर झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रस्तावाच्या चौकशीअंती भुषण सपकाळे याला २ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे. या हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पाहिले आहे.

Protected Content