जलतरणपटू कांचन चौधरीची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, अर्थातच साई, दिल्ली मार्फत भारत भरातून प्यारा ऑलम्पिक खेळाडू मधून एकूण ३६ जलतरणपटूंची निवड करण्यात आली असून यात जळगावच्या कांचन चौधरीचा समावेश आहे.

 

जलतरणपटूंचे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर ११ जुलै ते ९ ऑगस्ट पर्यंत ग्वालियर मध्य प्रदेश येथे सुरू झाले आहे. या शिबिरासाठी भारतातील एकूण ३६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या ३६ पैकी फक्त ७ महिला खेळाडू असून या ३६ पैकी महाराष्ट्रातील फक्त नऊ खेळाडूंचा समावेश आहे. जळगाव, धुळे, नगर व नाशिक या जिल्ह्या मधून जळगाव जिल्ह्याची एकमेव प्यारा ऑलम्पिक तथा जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू कांचन चौधरीची निवड झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा प्यारा ऑलम्पिक असोसिएशन व जळगाव जिल्हा जलतरण संघटनेतर्फे तिला घरी जाऊन निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जळगाव जिल्हा प्यारा ऑलम्पिक असोसिएशनचे तथा जलतरण संघटनेचे सचिव फारूक शेख, प्यारा ओलंपिक संघटनेच्या खजिनदार प्रभावती चौधरी, जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र ओक व सहसचिव तथा कांचनचे प्रशिक्षक कमलेश नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तिच्या या निवड बद्दल जैन इरीगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन,जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अतुलभाऊ जैन, अरविंद देशपांडे, प्यारा ऑलम्पिक संघटनेचे मो.आरिफ, शकील शेख, शैलेंद्र पवार, जलतरण संघटनेच्या रेवती नगरकर, प्रो. डॉ. अनिता कोल्हे तसेच झुनझुनवाला यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content