तापी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने घेतला जप्त वाळू साठा

जळगाव प्रतिनिधी । वाळू माफियांकडून जप्त करण्यात आलेला वाळू साठा तापी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने ४० लाख रूपयांमध्ये खरेदी केला आहे.

याबाबत वृत्त असे की, वाळू माफियांनी गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या उत्खनन करून सावखेडा शिवारात ठिकठिकाणी साठे तयार केले होते. अलीकडेच हे वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. या साठ्यांमधून डंपरद्वारे काही वाळूची वाहतूक करून जिल्हाधिकारी कार्यालयामागील मोकळ्या मैदानावर टाकली.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाळूसाठ्यांचे मोजमाप करण्यात असता येथे एकूण ८९९ ब्रास वाळू असल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रांत अधिकार्‍यांनी या वाळूसाठ्याचा लिलाव केला. यात कार्यकारी अभियंता तापी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने या वाळूसाठ्यांचा लिलाव ४० लाख रुपयांमध्ये घेतला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Protected Content