कैलास सोनवणे यांना मिळणार व्याजासकट इसारा रक्कम !

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांनी वाळू लिलावासाठी भरलेली इसारा रक्कम ही व्याजासकट देण्याचे निर्देश महसूल खात्याने दिले आहेत. या प्रकरणी त्यांनी दिवाणी खटला दाखल केला होता.

तीन वाळू गटांच्या लिलाव प्रकरणात शासनजमा केलेली अडीच लाख रुपयांची इसारा रक्कम लिलावधारक कैलास नारायण सोनवणे यांना व्याजासह देण्याबाबत महसूल विभागाने निर्देश दिले आहेत.

जळगाव तालुक्यातील धानोरा व टाकरखेडा तर एरंडोल तालुक्यातील वैजनाथ या तीन एकत्रित वाळूसाठ्यांकरिता सन २००६-०७मध्ये पाच बोलीधारकांनी इसारा रक्कम भरून भाग घेतला होता. त्यात कैलास सोनवणे यांनी इसारा रक्कम परत करण्याची विनंती केली होती. त्यांची अडीच लाख रुपये इसारा रक्कम शासन जमा केली होती. त्याविरुद्ध त्यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ही रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर महसूल विभागाने याबाबतचे निर्देश दिले आहेत.

Protected Content