नाहाटा महाविद्यालयात उद्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

nahata college

भुसावळ, प्रतिनिधी | भुसावळ कला,विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखाअंतर्गत आंतर विद्याशाखीय ‘माझे जीवन हाच माझा संदेश’ असा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्तचे औचित्य साधून ‘महात्मा गांधीजींच्या विचारांची समर्पकता’ याविषयावर उद्या (दि.४ फेब्रुवारी )रोजी एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सचिव विष्णु  चौधरी,कोषाध्यक्ष संजय नाहाटा व सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी ‘आजके संदर्भमे गांधी चिंतनकी उपादेयता’ याविषयावर प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध गांधी विचारवंत प्राचार्य डॉ. विश्वास पाटील ,शहादा यांचे बिजभाषण होणार आहे. या परिषदेस संपूर्ण देशभरातून संशोधक अभ्यासकांचे २५० शोधनिबंध हे चार खंडांमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. या परिषदेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील संबंधित सर्व प्राध्यापकांनी तसेच इतर अन्यक्षेत्रातील विचारवंत,संशोधक, अभ्यासकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा ,असे आवाहन प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे व परिषदेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले आहे.

Protected Content