Home Cities यावल भुसावळ-यावल बसमधून महिलेचे दागीने व रोख रक्कम लंपास

भुसावळ-यावल बसमधून महिलेचे दागीने व रोख रक्कम लंपास

0
118

sambhaji nagar chori

यावल, प्रतिनिधी | भुसावळ येथून यावलकडे येणाऱ्या एका प्रवासी महीलेचे दागीने व रोख रक्कम मिळवुन सुमारे ५०हजार रूपयाची चोरी काही अज्ञात चोरटयांनी केल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, गौरी रविन्द्र वंजारी (रा. तुर्भे मुंबई ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , मुंबईहुन पाटलीपुत्र एक्सप्रेसने भुसावळ येथे आली होती. भुसावळहुन यावल कडे दि. २८ जानेवारीला सकाळी ७ .३० वाजेच्या सुमारास बसमध्ये प्रवास करीत असतांना काहीअज्ञात चोरट्यानी तिच्याकडील बॅगेची चेन तोडुन त्यातील पाच ग्रॅमचे मंगळसुत्र , एक ग्रॅम सोन्याची पोत असे एकुण २७ हजार रुपये किमतीचे दागीने आणि २२ हजार रूपये रोख रक्कम अशी एकुण सुमारे ५० हजार रुपयाची चोरी केली. हा सर्व प्रकार फालक नगर बस थांब्यावर सकाळी ८ .२०च्या सुमारास घरी आल्यावर सदर महिलेच्या लक्षात आला. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .


Protected Content

Play sound