अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे तरूण गंभीर जखमी

jalgaon crime news

जळगाव प्रतिनिधी । ट्रॅक्टर सुधरवण्यासाठी पुण्याहून आलेल्या मेकॅनिकला गावकडे दुचाकीने नेत असतांना समोरून अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे तरूण गंभीररित्या जखमी झाले असून दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सचिन विलास महाजन (वय-25) रा. जवखेडा ता. एरंडोल यांचे ट्रक्टर सुधरविण्यासाठी पुण्याहून आलेला मेकॅनिक संदीप गोविंद बऱ्हाणपुरे (वय-36) या घेण्यासाठी सचिन दुचाकीने जळगावला आला होता. संदीपला दुचाकीने घेवून जळगावहून जवखेडा येथे जात असतांना सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघे तरूण गंभीर जखमी झाले. यात संदीप महाजन यांच्या उजव्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांना जैन कंपनीच्या रूग्णवाहिकेद्वारे जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Protected Content