रत्नापिंप्री येथे जि. प. प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा

parola

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील रत्नापिंप्री येथिल जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा बाल आनंद मेळावा हा नवा उपक्रम प्राथमिक शालेय जिवनातील विद्यार्थ्यांना पहावयास मिळत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्यापार आर्थिक देवान घेवान याचे प्राथमिक ज्ञानासोबतच मेळाव्याचे महत्व कळून येते आहे.

 

रत्नापिंप्री जि. प. प्राथमिक शाळेच्या आवारात नुकताच विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात झाला. सर्व प्रथम विद्यार्थीनींनी तयार केलेल्या रांगोळी स्पर्धेची पहाणी सोहळ्याचे उद्घाटन व बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण अधिकारी सी. एम. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय आवारात पहिली ते चौथी च्या वर्गातील विद्यार्थ्यानी एकुण विविध खाद्य पदार्थांची ८० दुकाने थाटण्यात आली होती. चहा, खमण, पोहे, चॉकलेट, पॉपकॉन , गुलाबजामुन, चकल्या ,मुरमुरे ,शेव, सोनपापड़ी, भजी, भाजलेले गहू, मोदक, पाव भाजी, लॉलीपॉप, बिट लाडू ,गोड बोर, चिवडा ,फरसाण ,भेल, हरभरा आदी उत्कृष्ट पदार्थांची स्टॉल तयार करण्यात आलेले होते. या आनंद मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी रत्नापिंप्री ,होळपिंप्री ,दबापिंप्री येथिल बहूसंख्य नागरीक , यशवंत माध्यमिक विद्यालया व दबापिंप्री, जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी यांनी विशेष सहभाग नोंदविला. शिक्षणाधिकारी सी. एम. चौधरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर पाटील , शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सोलंखी, दबापिंप्री शाळेचे मुख्याध्यापक भिमराव वरूडे, मनिषा पाटील, लिना पवार ग्रा. प. सदस्या रत्नाबाई पाटील, भिकन सुर्यवंशी, रघुनाथ पाटील, समितीचे सदस्य भिकनराव पाटील, अनिल मराठे, हरीचंद्र पाटील, सरीता पाटील, शितल पाटील, लताबाई भिल, आर. एफ. पाटील , सुरेखा बडगुजर, मिना भदाणे, ज्योती महाजन, मनोज ठाकरे ,सुरेश पाटील, रत्नापिंप्री, होळपिंप्री,दबापिंप्री ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content