मुख्याध्यापिका जहानुर तडवी यांची सेवानिवृत्ती

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील मालोद येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका जहानुर अमिरखा तडवी नुकताच सेवानिवृत्त झाल्या आहेत.

त्यांची 36 वर्षे सेवा झाली. त्यांचा सत्कार ग्रामपंचायत प्रशासक हबीब तडवी (ग्रामविस्तार अधिकारी) तसेच शाळेतील शिक्षक, परिवार व विद्यार्थ्यांनी यांनी निरोप देतांना केला. तसेच या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक हबीब तडवी, ग्रामसेवक राजू तडवी, शिक्षक जितू आराक, अनिल तडवी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नबाब तडवी, शिक्षणतज्ञ समीर तडवी , शासकीय आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तलाठी, त्यांचा परिवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!