सोपान नगरात आगीत संसारपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव- शहरातील सत्यम पार्कजवळील सोपान नगरात घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून यात सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात आगीची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील सत्यमपार्कमधील सोपान नगरात सुनिता शरद पाटील या वास्तव्यास आहेत. २७ रोजी रात्री ८ ते २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील भांडे, कपडे, लाकडी पलंग, गादी यासह संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामनविभागाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली असून याप्रकरणी सुनिता पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!