यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा, यासाठी तालुक्यातील रहिवासी आणि नागरीकांनी जिथे आहेत तिथे रहावे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावलचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी दिला आहे.
पो.नि. धनवडे यांनी आवाहन केले आहे की, गेल्या महिन्याभरापासून देशातू लॉकडाऊन असतांना शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणतेही नातेवाईक गावात बोलावू नये, किंवा येत असतील तर त्यांना न येण्याबाबत कळविण्याचे यावे, कोणालाही गावात स्वत:च्या घरी बाहेरून आल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. तसे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येवून १४ दिवस शासकीय यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहेत. या गुन्ह्यांमये दोन वर्षांपर्यत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळताना गुन्ह्याची नोंद झाल्यास कोठेही नोकरी मिळणार नाही. सद्यस्थितीत शासनाने जिथे आहे तिथेच रहावे असे आवाहन व आदेश असतांना देखील काही जण चोरून-लपून दुधाची गाडी, ॲम्ब्यूलन्स किंवा दुचाकीवर जीव धोक्यात घालून प्रवेश करत आहे. अशा लोकांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी असा कुठलाही प्रयत्न करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. याची प्रत्येकाने गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच अशा कारवाई करीता कोणी पकडले गेल्यास, संबंधीतांना सोडविण्यासाठी कोणीही आमच्या ओळखीचा गैरवापर करू नये असे आवाहन. पोलीस निरीक्षक धनवडे यांनी केली आहे.