हिंगणघाट पिडीतेची उज्ज्वल निकम मांडणार बाजू

 

Ujjwal Nikam

 

मुंबई (वृत्तसंस्था) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणात सरकारच्या वतीने पीडितेची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे मांडणार आहेत. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

 

हिंगणघाट येथील जळीत प्रकरणसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे. ‘हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिला जाईल. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content