यावल बस स्थानकावर दोन महिलांचे मंगळसूत्र चोरटयांनी लांबवले

0e3d132f fd0a 4795 9ea2 39c7b3305fe7

यावल, प्रतिनिधी । येथील बसस्थानकावर दोन अज्ञात चोरटया महिलांनी दोन प्रवासी महिलांच्या गळयातील मंगळसूत्र चोरून पोबारा केल्याची घटना आज (दि. ७) दुपारी १ु२ .३० च्या सुमारास घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन बसची तपासणी केली, मात्र चोरटे आढळले नाहीत. पुढील तपास सुरु आहे.

 

याबाबत वृत असे की, येथील बसस्थानकावर आज दुपारी १२.३० च्या सुमारास बऱ्हाणपू र कडून शिर्डीला जाणारी बस (क्रमांक एम .एच .१४ , बी. सी. १६o२) ही येथील बस स्थानकावर पोहोचली असता सौ. सुंनदा राजेश कापडे, रा. नाचणखेडा ता. जिल्हा बऱ्हाणपूर आणि मीराबाई युवराज पाटील, रा. मोहराळे ता . यावल या दोन्ही महीला या बसने चोपडयाकडे जाण्यासाठी गाडीत बसत असतांना बसच्या दरवाज्याजवळ उतरण्याच्या कारणाने दोन अज्ञात महि लांनी गोंधळ घालून या दोघा प्रवासी महिलांच्या गळयातील प्रत्येकी चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र शिताफी तोडून पळ काढला.
या घटनेची माहीती कळताच तत्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असलम शेख आणि नितिन चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन , बसची झाडाझडती केली. आज शुक्रवार असून हा येथील आठवडे बाजार दिवस असल्याने अनेक चोरटे नेहमीच बसस्थानक किंवा बाजारात चोरी करण्याच्या इराद्याने फिरत असतात अशावेळी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे अत्यंत गरजे आहे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Protected Content