मोठी बातमी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-रावेर बसचा अपघात; ६ प्रवाशी जखमी !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर डेपोची बस पुणे ते रावेर असा प्रवास सुरू असतांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा घाटातील फारेस्ट गेटजवळ समोरून येणारे टेम्पो वाहनाला दुसरी बस ओव्हर टेक करत होती. त्यावेळी चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जावून ७ फूट खाली जावून पलटी झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ६ ते ८ प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याबाबत अधिक असे की, रावेर आगारातील बस क्रमांक (एमएच ४० वाय ५१९७) ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असतांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटातील फारेस्ट गेट समोरून बस जात असतांना समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच २० जीसी ७८४०) ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती. त्यावेळी पुणे-रावेर बसवरील चालक योगेश तायडे यांचे बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून ७ फूट खाली जावून पटली झाली. या बसमध्ये एकुण ७२ प्रवाशी होते. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंत अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच जखमींचे नावे देखील समोर आलेले नाही. या संदर्भात जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Protected Content