पंचवीस लाखासाठी विवाहितेला ठार मारण्याची धमकी; पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुकान घेण्यासाठी माहेराहून २५ लाख रूपय आणावे यासाठी विवाहितेला अंगावर रॉकेल टाकून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह सहा जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राखी राजेश तलरेजा (वय-३८) रा. गणेश नगर, सबजेलच्या मागे जळगाव यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील राजेश रामचंद तलरेजा यांच्याशी सन २०१२ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पती राजेश तलरेजा याने दुकान घेण्यासाठी माहेरहून २५लाख रूपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेच्या डाव्या हातावर चटका देवून जखमी केले. तर पैसे आणले नाही तर अंगावर रॉकेल टाकून जिवंत ठार करण्याची धमकी दिली. यासाठी पतीचे मोठे तीन भाऊ, पुतण्या आणि चुलत जेठ यांनी देखील मारहाण केली. यात विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्य तक्रारीवरून पती राजेश रामचंद्र तलरेजा, जेठ अमर रामचंद्र तलरेजा, जेठ, विनोद रामचंद्र तलरेजा, जेठ मुकेश रामचंद्र तलरेजा, पुतण्या अजय मुकेश तलरेजा सर्व रा. छोटी सिंधी कॉलनी वाटर सप्लाय, कंवर नगर, मलकापूर जि. बुलढाणा आणि चुलत जेठ सुभाष तलरेजा रा. बुलढाणा यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Protected Content