Home क्राईम जामनेर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0
100

suicide PTI L 696x447

जामनेर, प्रतिनिधी | शहरातील जळगाव रोड परीसरातील संगीता विनोद कुमावत (वय ४२) या विवाहीत महीलेने घरगुती कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रहात्या घरामधीलच स्वयंपाकघरातील छतावरील पंख्याला साडीच्या सहायाने संगीता कुमावत यांनी गळफास घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसले. लागलीच पोलीसांना पाचारण करून प्रेत दवाखान्यात आणण्यात आले. पोलीसठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत महीलेच्या पश्चात सासु, सासरे, पती, मुलगी, मुलगा असा परीवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.


Protected Content

Play sound