Home क्राईम महिलेचा चौघांकडून अश्लिल हातवारे करून विनयभंग

महिलेचा चौघांकडून अश्लिल हातवारे करून विनयभंग

0
102

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेचा अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात २७ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा इरफान आयुक्त सय्यद, शाहरुख आयुब सय्यद, फारुख आयुब सय्यद आणि समायुब सय्यद या चौघांनी तिला अश्लील हातवारे करून करून तिचा विनयभंग केला. यानंतर घडल्यानंतर पीडित महिलेने आपले पती यांना हा प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ८.३० वाजता संस्थेत आरोपी इरफान आयुक्त सय्यद, शाहरुख आयुब सय्यद, फारुख आयुब सय्यद, आणि समा अयुब सय्यद या चौघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound