नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून १०१९७ वर पोहोचली आहे. तर देशभरात गेल्या २४ तासांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आतापर्यंत देशात एकूण ११ हजार ९३३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी दिल्लीत २४ तासांत केवळ १७ रुग्ण, तर केरळमध्ये फक्त १ रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आजपर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. यापैकी १०४७७ जणांवर उपचार सुरु असून १४८९ जणांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


