लॉक डाऊन : महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एक मूठ धान्य उपक्रम

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून गाव पातळीवर ती २००० च्यावर विधवा परितक्त्या, एकल गरीब वंचित दुर्बल घटकातील महिलांचे स्वयंसहाय्यता समुह तयार करून संस्था बांधण्याचे कार्य चालू आहे. या महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एक मूठ धान्य घरोघरी जाऊन जमा करून ते गरजुंना वाटप करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हाताला काम नाही म्हणून काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून गावांमध्ये गटामध्ये समाविष्ट असलेल्या महिलांचे संघटन आहे. या संघटनमध्ये स्त्रीशक्तीची व गरिबीची जाणीव आहे म्हणून या महिलांनी गावांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महिलांनी मिळून गरजूंसाठी एकत्रित करून धान्य गोळा करत आहे. प्रत्येक कुटुंबाला मधून त्याला शक्य होईल तेवढी धान्य त्यामध्ये एक किलो असेल किंवा एक मूठ असेल असा वाटा घेतला जात आहे. या माध्यमातून तालुकाभर एक मूठ धान्य हा उपक्रम चालू आहे. टप्प्याटप्प्याने पूर्ण गावांमध्ये रोज अशा प्रकारचे कार्य होत आहे. आता पर्यंत १२ गावांमध्ये ९०१ किलो ९ क्विंटल धान्य १०० ते १२० कुटुंबापर्यंत पोहचले आहे. तालुका गट विकास अधिकारी डी. एस. लोखंडे , तालुका व्यवस्थापक अमोल नप्ते , प्रभाग समन्वयक म्हणून कैलास गोपाळ आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

Protected Content