गुजराथी समाज महिला मंडळाचा आनंद मेळा उत्साहात

WhatsApp Image 2020 01 12 at 5.45.14 PM

जळगाव, प्रतिनिधी | महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून रविवार (दि.१२) रोजी गुजराथी समाज महिला मंडळाच्या वतीने आनंद मेळा हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. यात महिलांनी बनविलेल्या घरगुती विविध वस्तू आणि खाद्य पदार्थांचे ११५ च्यावर विविध स्टॉल होते. विशेष म्हणजे,या आनंद मेळ्यात सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी विवध गेम्स देखील होते. नागरिकांमध्ये याठिकाणी विशेष उत्साह आणि आनंद दिसून आला.

आमदार राजूमामा भोळे आणि आमदार चंदुलाल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुजराथी समाज महिला मंडळाचा आनंद मेळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी गुजराथी समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी, रमण पटेल, प्रकल्प अध्यक्ष मुकेश चौहाण, गुजराथी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भावना चौहान, सचिव रंजन पटेल, प्रकल्प प्रमुख निता परमार उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात आ. भोळे यांनी आनंद मेळा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत,नक्कीच या उपक्रमामुळे महिलांना एक व्यासपीठ मिळाले असल्याने त्यांस प्रोत्साहन मिळेल. या माध्यमातून महिलांना आपली कलाकुसर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे असेही ते यावेळी म्हणाले. तर आ. पटेल यांनी हा आनंद मेळा म्हणजे, गुजराथी समाजातील विविध जातीच्या आणि इतर समाजासाठी चांगले कार्य असल्याचे सांगत कार्यक्रम आयोजनाबाबत कौतुक करत असा उपक्रम दर वर्षी राबवावा असे सांगितले. गुजराथी समाज महिला मंडळाचा हा प्रथम उपक्रम असून तो ना नफा ना तोटा या तत्त्वावर घेतला आहे असे, अध्यक्षा भावना चौहाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन नूतन कक्कड यांनी केले.तर आभार सचिव रंजन पटेल यांनी मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष, सचिव यांसह सहसचिव वंदना भाटिया, खजिनदार यामिनी परमार, सहखजिनदार नीता परमार, कार्याध्यक्ष माया दोषी, सहकार्य अध्यक्ष जयश्री मेहता, सदस्य कीर्ती चौहाण, बिंदिया जानी, जागृती मेहता, किरण वणरा, शीला पटेल, मनीषा सराफ, गीता शाह सल्लागार म्हणून, छाया भाटिया, नैना संघवी, सुमन पटेल, सुनिता कोठारी, स्मिता वेद, शकुंतला पटेल यांनी सहकार्य केले.

Protected Content