नवरात्रोत्सवात श्री मनुदेवी मंदीरात भाविकांची गर्दी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खानदेशवासीयांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या श्री मनुदेवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्ताने सोमवारी ३ ऑक्टोंबर रोजी अष्टमीनिमित्ताने ११ दांपत्याच्या हस्ते होम-हवनाचा कार्यक्रम करण्यात आला. घटस्थापनेपासून दररोज हजारो भाविकांनी श्री मनुदेवीचे दर्शन घेतले. अष्टमीलाही भाविकांची गर्दी मोठया प्रमाणावर उसळली होती.

यावल तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या क्षेत्रात तालुक्यातील आडगाव पासून नऊ किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री मनुदेवी नवरात्री उत्सव सुरू आहे. सोमवारी अष्टमीनिमित्ताने ब्रह्म वृंदाच्या मंत्रोच्चारात प्रेमराज हिंमत पाटील, सूर्यभान प्रल्हाद पाटील, नामदेव धोंडू कोळी, जयवंत रमेश पाटील, किरण रत्नाकर पाटील, भूषण निळकंठ चौधरी ,निलेश युवराज किरंगे, वाल्मीक सोनवणे, शशिकांत हिरामण पाटील, पवन प्रकाश सोनार, संजय दामू पाटील, नितीन मधुकर शिरसाठ, एम .एस.पाटील , दिलीप धोंडू पाटील, या ११ दांपत्यांचे हस्ते यज्ञ पूजा पार पडली.

गेल्या सात दिवसापासून जळगाव जिल्ह्यासह राज्यातील धुळे बऱ्हाणपूर नाशिक मुंबई पुणे येथील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी आले होते, जळगाव जिल्ह्यातील सर्व एसटी आगारातून यात्रोत्सवाच्या निमित्ताने दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसाठी बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात्रोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्या कामी मंदिर समितीचे अध्यक्ष शांताराम पाटील व सर्व विश्वस्त आडगाव ग्रामस्थ, पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन , पश्चिम वनविभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे, एस.टी .आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन व जितेन्द्र जंजाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content