शेंदुर्णी येथे दिव्यांग बांधवांना आठ मोटारसायकलींचे वितरण

शेंदुर्णी प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीश महाजन व जीएम फाऊंडेशनतर्फे दिव्यांगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आठ मोटारसायकलचे आज नगरपंचायत प्रांगणात वितरण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पती अमृत खलसे, उपनगराध्यक्षा पती गोविंद अग्रवाल, नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी, शाम गुजर, शरद बारी, संजय गायकवाड यांच्याहस्ते लाभार्थ्यांना मोटारसायकलचाबी व पेढा भरवून मोटारसायकल ताब्यात देण्यात आल्या.

तालुक्यातील प्रत्येक महिला व पुरुष दिव्यांगांना अश्या मोटारसायकल वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोटार सायकल लाभार्थी संजय बारी, बापू सोनार, भगवान बारी, संजय बारी, देविदास निकम इतर लाभार्थी उपस्थित होते. त्यांनी मोटारसायकल दिल्याबद्दल आमदार गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केलेत. तसेच शेंदूर्णी नगरपंचायतकडुन शेंदूर्णीतील पात्र ६६ दिव्यांगांच्या बँक खात्यात प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे १ लाख ९८ हजार रूपयांचे अनुदान ऑनलाईन टाकण्यात आल्याचे नगरपंचायतचे वतीने सांगण्यात आले.

Protected Content