किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा; भीम आर्मीची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा असून विद्यार्थ्यांचे भविष्य उध्दवस्त करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाने नुकतेच किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून अनेक परिवार उघड्यावर येतील. शासनाने कोणताही विचार न करता केवळ महसूल मिळवण्याच्या नादात केंद्र सरकार इथे खुलेआम मरणाला विकण्याचीच परवानगी देत आहे.  तातडीने हा निर्णय शासनाने मागे घ्यावा अन्यथा भीम आर्मीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे सचिव सुपडू संदानशिव यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.

 

यावेळी सुपडू संदानशिव यांनी सांगितले की, अगोदरच खेडोपाडी, ग्रामीण भागात अनेक परिवारांचे दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त झाले आहेत, आज सुद्धा दारूच्या आहारी जावून अनेकांचे कौटुंबीक वाद आपण रस्त्यावरती होतांना दिसतात. ग्रामीण क्षेत्रात संध्याकाळी ६ वाजेनंतर गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असतांना त्यात भर म्हणून की काय, राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांनी ही जागरूक होणे गरजेचे आहे, जर किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध झाली तर मुलांवर याचा काय दुष्परिणाम होईल याचा सारासार विचार करावा असे आवाहन केले आहे.

 

Protected Content