जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन २०२० च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना सन 2020 चे पुरस्काराचे अर्जाचे वाटप हे दिनांक 15 ते 22 ऑगस्ट, 2020 कालावधीत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्जदाराकडून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज दिनांक 22 ऑगस्ट, 2020 पूर्वी स्वीकारण्यात येतील, मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही.

अर्ज 25 ऑगस्ट, 2020 पूर्वी आयुक्तालयास सादर करावयाचे असल्याने वेळेत अर्ज करावा. अर्ज केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या WWW.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप
उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीथयश व्यक्ती (रोल मॉडेल), दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या उत्कृष्ट संशोधन, उत्पादन, निर्माती, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहित वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था, दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ट ब्रेल कारखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित करणारे उत्कृष्ट राज्य, याप्रमाणे पुरस्कराचे स्वरुप आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, संस्था यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content