जामनेरात श्रीराम मित्र मंडळातर्फे होणार रावण दहन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व वैद्यकीय शिक्षण, तथा क्रीडा युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते सुमारे ५१ फुट उंचीच्या भव्य रावणाचे दहन विजयादशमी निमित्ताने जुना बोदवड रोडवरील मम्मा देवी जवळ, दसरा मैदानावर होणार आहे. श्रीराम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यां कडुन रात्रंदिवस रावणाची प्रतिक्रुती निर्माणाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

स्व. के. एम. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे रावणाची प्रतिकृती व मुखवटे तयार केले जात होते. पुढे वडीलांचा हाच वारसा कायम ठेऊन जामनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणाचे (दशानन) मुखवटे हुबेहुब तयार केले जात आहेत.रावणाची प्रतिक्रुति निर्माणापासून ते रावण दहना पर्यंत उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांचे मंडळास अनमोल व विशेष सहकार्य लाभले जाते.
विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी दसरा मैदानावर रंगबिरंगी, आकर्षक व नेत्रदीपक अशा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. ठीक ७ वाजता विराट रावणाचे दहन केले जाणार असल्याचे श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गिरीश महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. किरण शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले, तथा नगरसेवक, नगरसेविका, या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत.

या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भव्य रावण दहनाच्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोहर राजाराम माळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content