मोबाईल दुकान फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीत मोबाईल दुकानाच्या टपरीचा पत्रा वाकवून दुकानातून ३१ हजार रुपये किंमतीचे बल्यूटूथ, हेडफोन व स्पीकर लांबविल्याची घटना सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनीत मुबिन सिकंदर खाटील (वय-३२) हा तरुण राहत असून त्याचे सुप्रिम कॉलनीजवळच मोबाईलचे साहित्य विक्री करण्याचे दुकान आहे. रविवारी २ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास टपरीचा पत्रा वाकवून चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून ३१ हजार रुपये किंमतीचे हेडफोन, बल्यूटूथ, स्पिकर, केबल, चार्जर, बॅटरी असा ऐवज लांबवून नेला. सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुबिन हा दुकानावर गेला असता, त्याला दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्याने तात्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content