Home क्राईम जळगावातील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू

जळगावातील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू

0
106


 

जळगाव प्रतिनिधी । नव प्रसूत झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सबीना नदीम खाना (वय-२१) रा. इस्लामपूरा, सुभाष चौक, जळगाव ह्या गरोदर महिला महिल्या बाळंपणासाठी माहेरी कासोदा ता. एरंडोल येथे गेल्या होत्या. सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी त्याची घरीच प्रसूती झाली. त्याना मुलगी झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासाळल्याने जळगाव येथील खासगी रूग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल केले. रात्री १० वाजता प्रकृती अधिकच खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तिची अखेर मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. व तिची प्राणज्योत मालवली. यानतंर करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound