दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली हिंसाचार बळींची संख्या आज सायंकाळपर्यंत २४ वर पोहोचली आहे. शदरम्यान, शहरातील अनेक भागांत अजूनही तणावाची परिस्थिती कायम आहे.

 

दिल्लीत आज सकाळी चार मृतदेह सापडलेत. यात आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तर याआधी एक पोलीस कर्मचाऱ्याचा गोळीबारामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या २४ तासांमध्ये तीन बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दंगलग्रस्त भागांची पाहणी केली आहे. दरम्यान, दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला बोलवा, तरच लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

Protected Content