“सुरभि” तर्फे जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुरभि बहुद्देशिय महिला मंडळा तर्फे दी 18 सप्टे रविवार रोजी दु 1 वा ,ब्राह्मण सभा बळीरामपेठ, जळगांव येथे जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

भावगीत स्पर्धेचे हे 18 वे वर्ष असून ही स्पर्धा फक्त महिला व मुलींसाठी आहे. 8 ते 16 व 17 ते 40 ह्या दोन वयोगटात होणार आहे. स्पर्धकांना फक्त भावगीत व दोनच कडवी म्हणायची आहेत. स्पर्धकांना सुर व ताल ह्याचे ज्ञान असणे आवश्यक असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, साथीदार स्वतःहा आणले तर चालतील,नाहीतर मंडळातर्फे सुद्धा पुरवण्यात येतील.

विजेत्या प्रथम येणाऱ्या स्पर्धकास 1000रु व “स्वरश्री ” चषक , द्वितीय 700 रु ,तृतिय 500 रु , उत्तेजनार्थ 251 रु व प्रमाणपत्र देण्यात येतील. लहान गटास कै ऍड बापूसाहेब परांजपे (पाचोरा) व मोठ्या गटास कै ऍड अ वा अत्रे (जळगाव) तसेच उत्तेजनार्थ कै.शुभांगी श्रीरंग पुराणकर ह्यांच्या स्मरणार्थ बक्षीसे दिली जातील. दु 1 वा कार्यक्रम सुरु होईल व संध्या 5 वा बक्षीस समारंभ होईल, 13 सप्टेंबर पर्यतच नाव नोंदणी सौ स्वाती कुळकर्णी,3, आशीर्वाद,विजय कॉलनी,गणेश कॉलनी रोड ,व सौ मंजुषा राव,प्लॉट न 12, ऋणानुबंध ,झेड पी कॉलनी जवळ ,ह्यांच्या कडे करावी, वेळेवर स्पर्धेत प्रवेश मिळणार नाही, जास्तीत जास्त जिल्ह्यातील रसिक स्पर्धकांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले आहे .

Protected Content